जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील चंदगाम भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. या भागात आणखी दोन ते तीन दहशतवादी आता लपून बसल्याचा संशय आहे. सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांविरोधात अजूनही कारवाई सुरू असून अन्य् दहशदवाद्यांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु आहे.
J&K: An encounter is underway between security forces and terrorists in Chandgam area of Pulwama district. One terrorist has been killed in the operation, as per police.
(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/uAZJwwpqTo
— ANI (@ANI) January 5, 2022
याबाबत माहिती देताना काश्मीर झोन पोलिसांनी सांगितले की, सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते मात्र दहशदवाद्यांनी सुरक्षा दलाचे न मानता हल्ला केला व चकमक सुरू झाली. यामध्ये एक दहशतवादी ठार करण्यात सुरक्षा दलास यश आले आहे. अन्य् दोन दहशदवाची लपून बसल्याचा संशय जवानांना असून त्यांचा शोध घेण्याचे काम चालू आहे. दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी सुरक्षा दलांनी सुरू केलेल्या या ऑपरेशनदरम्यान कालच मोठे यश जवानांना मिळाले आहे. काल श्रीनगरमध्ये दोन वेगवेगळ्या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.