मुंबई – कॅसेट किंग गुलशन कुमार यांचे पुत्र आणि टी सीरीज या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार यांच्यावर बलात्काराचा आरोप आहे. टी सीरीजमध्ये काम देण्याचं आमिष दाखवून एका तीस वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
या महिलेने आरोप केले होते की,’ टी सिरीजच्या आगामी चित्रपटात काम देण्याचं आमिष दाखवून भूषण कुमार यांनी माझ्यावर 2017 पासून 2020 पर्यंत वेळोवेळी बलात्कार केले. तसंच तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली.’ असा आरोप तिने केला आहे.
दरम्यान, या प्रकरणामध्ये आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे नाव आल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. सोशलवर एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे ज्यात पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी मदत करणाऱ्या मलिकार्जुन पुजारी या सामाजिक कार्यकर्त्याला जितेंद्र आव्हाड धमकी देत आहे.
काय आहे व्हायरल ऑडिओ क्लिप
THE BIGGEST EXCLUSIVE !!!!
MVA Minister @Awhadspeaks asking a person named Pujari to not help a girl who has accused T-Seriers Honcho Bhushan Kumar.
Let the Girl commit suicide Bhushan has asked help from @PawarSpeaks & @praful_patel.
Another Sushant Type Suicide/Murder ?? pic.twitter.com/urLxqXg1Du
— Sameet Thakkar (@thakkar_sameet) September 3, 2021