पुणे – अल्पवयीन मुलीवर ऍसिड फेकण्याची धमकी देण्यात आली. तसेच आयलव्ह यू बोलून, तु माझ्याशी लग्न कर , नाही तर तुला जाळूण टाकण्यात येईल अशीही धमकी देण्यात आली.
याप्रकरणी येरवडा पोलिसांनी मोहमंद हुसेन खान ( 45 ,रा.सय्यदनगर, येरवडा ) याला अटक केली आहे. आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तर मुलगीचे शिक्षण 9 वी पर्यंत झाले असून सध्या ती घरीच असते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी 16 वर्षीय मुलीच्या घरासमोरच आरोपी रहायला आहे. त्याने तीच्या घरामध्ये स्वत:चा मोबाईल नंबरची चिठ्ठी फेकून फोन करायला सांगितले. अन्यथा चेहऱ्यावर ऍसिड फेकण्याची धमकी दिली.
तसेच तो येता जाता फिर्यादीला आय लव्ह यू बोलून तीचा पाठलाग करुन घाबरवत होता. तु माझ्याशी लग्न कर नाही, तर तुला जाळून टाकीन, तुझे वय 18 वर्षे होत पर्यंत मी वाट पाहिन, तु माझ्याशीच लग्न कर अशी धमकी तो तीला सतत देत होता. याप्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक ठाकून करत आहेत.