मुंबई – हॉलीवूडमधील आघाडीची ऍक्ट्रेस जेनिफर लॉरेन्स हिचे काही न्यूड फोटो काही काळापूर्वी इंटरनेटवर लीक झाले होते. या प्रकारानंतर जेनिफर लॉरेन्स खूप मानसिक तणावाखाली होती. तिला या घटनेबद्दल अजूनही मनस्ताप होतो आहे.
ही घटना 2014 मधील होती. हॅकर्सनी बऱ्याच सेलिब्रिटीजचे 500 पेक्षा अधिक पर्सनल फोटो लीक करून एका वेबसाईटवर प्रसिद्ध केले होते. या सेलिब्रिटीजमध्ये जेनिफरव्यतिरिक्त रिहाना आणि सलीना गोमेज यादेखील होत्या. या घटनेचा धक्का जेनिफरला अजूनही त्रास देतो आहे.
“माझे न्यूड फोटो माझ्या मर्जीशिवाय कोणीतरी बिनधास्तपणे बघू शकते आहे. ही जाणीव खूप त्रासदायक आहे.’ असे ती म्हणाली. या मानसिक धक्क्यामुळे 2017 मध्ये जेनिफरला नैराश्य आले होते. आपण आता मरणार अशी भीती तिला वाटायला लागली होती.
या व्यतिरिक्त आता जेनिफर आपल्या “डोंट लूक अप’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. हा एक सायन्स फिक्शन ब्लॅक कॉमेडी आहे. यामध्ये जेनिफर व्यतिरिक्त लिओनार्दो दी कॅप्रिओ, रॉब मॉर्गन, जोना हिल, आरियाना ग्रॅन्ड आणि मरिल स्ट्रीपसारखे बडे कलाकार आहेत. 10 डिसेंबरला थिएटरमध्ये आणि 24 डिसेंबरला नेटफ्लिक्सवर हा सिनेमा रिलीज होणार आहे.