बॉलिवूडची सौंदर्यवती, जिने 70-80 च्या दशकात आपल्या अलौकिक सौंदर्याने आणि अप्रतिम अभिनयाने सिनेरसिकांना भुरळ पाडली.
चिरतरुण सौंदर्य म्हणजे नेमकं काय, असा प्रश्न कोणाच्या मनात घर करत असेल तर त्यांना या प्रश्नाचं उत्तर एका अभिनेत्रीचा चेहरा पाहूनच मिळेल. तिच्या नजरेचा एकच कटाक्ष या प्रश्नाचं उत्तर देऊन जातो. तो चेहरा ती अभिनेत्री म्हणजे ‘रेखा’.
सौंदर्य आणि चित्रपटातील भूमिकेशिवाय रेखा आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. रेखाच्या बेधडक वक्तव्यांमुळे काही वेळा फॅन्स कडून दाद दिली जाते तर कधी ट्रोलही केले जाते.
यातच, यासिर उस्मान यांनी रेखा यांच्या आयुष्यावर एक पुस्तक लिहिलं होत. या पुस्तकात त्यांनी सांगितलं होतं की एका मुलाखतीत रेखा म्हणाल्या होत्या, “तुम्ही एका माणसाच्या जवळ जात आहात. पण तुम्ही जाऊ शकत नाही. कारण शारीरिक संबंधाशिवाय तुम्ही कोणच्या जवळ जाऊ शकत नाही. तर लग्नाआधी शारीरिक ठेवण्यात काहीही हरकत नाही असे त्या म्हणाल्या होत्या.
रेखाच्या बेधडक वक्तव्यांमुळे सध्या सोशलवर चांगलीच चर्चा सुरू आहे. काहींना त्यांची भूमिका पटली आहे तर काहींना ही भूमिका पटलेली नाही. सध्या या वक्तव्यांवरून त्यांच्यावर ट्रोलिंग होत आहे.