निवडणुकीच्या कर्तव्यार्थ असलेले जयंत चंदनशिवे यांचे अपघाती निधन

कोल्हापूर – कोल्हापूर लोकसभा मतदार संघातर्गत 275- करवीर विधानसभा मतदार संघामध्ये निवडणूक कर्तव्यावर असलेले गगनबावडा तहसिल कार्यालयातील तलाठी जयंत चंद्रहार चंदनशिवे यांचे अपघाती निधन झाले असून त्यांच्या वारसांना 15 लाखाचे सानुग्रह अनुदान देण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनामार्फंत प्राधान्याने करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दौलत देसाई यांनी आज येथे बोलतांना सांगितले.

चंदनशिवे यांना अपघातामुळे डोक्‍यास गंभीर दुखापत झाली असल्याने उपचारा दरम्यान आज दुपारी 3.30 वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. श्री.चंदनशिवे यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण जिल्हा प्रशासन व्यथीत असून त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात जिल्हा प्रशासन सहभागी असल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले.

निवडणुकीच्या कर्तव्यार्थ असताना निधन झालेले जयंत चंद्रहार चंदनशिवे यांच्या कुटुंबियांना शासन निर्णयानुसार 15 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देता येते. त्यानुसार जयंत चंद्रहार चंदनशिवे यांच्या वारसांना 15 लाखाचे सानुग्रह अनुदान देण्याची कार्यवाही प्राधान्याने करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी स्पष्ट केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.