Jaya Bachchan : अभिनेत्री जया बच्चन त्यांच्या स्वभावामुळे नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत. अनेकदा त्या पापाराझींवर संतापल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जाते. दरम्यान, जया बच्चन, श्वेता बच्चन आणि नव्या नंदा त्यांच्या ‘व्हॉट द हेल, नव्या’ या पॉडकास्टचा आणखी एक सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच त्याचा प्रोमो रिलीज झाला आहे. या प्रोमोमध्ये जया बच्चन लग्नाविषयी बोलताना दिसत आहेत. यावेळी जया बच्चन यांनी केलेले विधान चांगलेच चर्चेत आले आहे.
जया बच्चन यांचा ‘व्हाट द हेल, नव्या’ या कार्यक्रमातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जया बच्चन लग्नाबद्दल भाष्य करतात. तसेच त्या ‘जया-इंग’ या शब्दाचा अर्थ सांगताना दिसत आहेत. लग्नानंतर नात्यात रोमान्स संपतो, असंही त्या म्हणाल्या आहेत. नव्या नंदाला ‘जया-इंग’ या शब्दाचा अर्थ सांगताना जया बच्चन म्हणाल्या, “जया-इंग’ या शब्दाचा अर्थ दिशादर्शक असा आहे.”
View this post on Instagram
पॉडकास्टच्या प्रीमियरआधी नव्या नंदाने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. तिने लिहिलं आहे, “व्हाट द हेल नव्या’च्या नव्या सीझनसाठी आम्ही उत्सुक आहोत. आम्ही गप्पांमध्ये खूप गुंतलो आहोत. आई आणि आजीसोबतचा नवा सीझन तुमच्या भेटीसाठी सज्ज आहे”. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या प्रोमोला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून हा शो पाहण्यास अनेकजण उत्सुक आहेत.