Lok Sabha Election 2024 : भाजपने होळीच्या दिवशी महाराष्ट्रातील आणखी 3 उमेदवारांची नावे घाेषित केली. भाजपने आतापर्यंत 23 उमेदवारांना संधी दिली असली तरी त्यांचे मित्र म्हणजेच महायुतीतील शिंदे आणि अजित पवार गटाने अद्याप एकही उमेदवारी जाहीर केलेला नाही. दुसरीकडे काँग्रेसने आतापर्यंत महाराष्ट्रातून 11 उमेदवारांची यादी घोषित केली आहे. त्यामुळे आता महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात 9 ठिकाणी थेट लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
भाजपने महाराष्ट्रातून आपल्या पहिल्या यादीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यमंत्री डॉ. भारती पवार, रावसाहेब दानवे, कपिल पाटील यांच्यासह डॉ. हीना गावित, रक्षा खडसे, रामदास तडस, प्रतापराव पाटील चिखलीकर, सुजय विखे पाटील, सुधाकर श्रृंगारे, रणजितसिंह नाईक निंबाळकर, संजयकाका पाटील यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. | Lok Sabha Election 2024
तसेच उत्तर मुंबई, ईशान्य मुंबई, बीड, अकोला आणि जळगाव येथे विद्यमान खासदारांऐवजी दुसऱ्यांना संधी दिली आहे. भाजपने यंदा आपल्या पाच विद्यमान खासदारांना डच्चू दिला आहे. दुसऱ्या यादीत भंडारा- गोंदियातून सुनील बाबुराव मेंढे, गडचिरोलीतून अशोक महादेवराव नेते आणि सोलापूरमधून राम सातपुते यांना संधी दिली आहे. | Lok Sabha Election 2024
5 विद्यमान खासदारांचा पत्ता कट
भाजपाने आत्तापर्यंत जी २३ नावं जाहीर केली आहेत त्यानुसार पाच विद्यमान खासदारांची तिकिटं कापण्यात आली आहे. उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी, बीडच्या खासदार प्रीतम मुंडे, मुंबई उत्तर पूर्वचे खासदार मनोज कोटक, जळगवाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना भाजपाने तिकिट दिलेलं नाही. तर सोलापुरात जयसिद्धेश्वर स्वामी हे भाजपाचे खासदार आहेत. त्यांच्याऐवजी राम सातपुतेंना तिकिट देण्यात आलं आहे. | Lok Sabha Election 2024
दुसरीकडे काँग्रेसने आतापर्यंत महाराष्ट्रातून 11 उमेदवारांची यादी घोषित केली आहे. यात कोल्हापूर मतदार संघातून शाहू महाराज, पुण्यातून रवींद्र धंगेकर, नंदुरबारमधून गोवाल पाडवी, सोलापूरमधून प्रणिती शिंदे, लातूरमधून शिवाजी कालगे, नांदेडमधून वसंत चव्हाण आणि अमरावतीमधून बळवंत वानखेडे, नागपूरमधून विकास ठाकरे, रामटेकमधून रश्मी बर्वे, गडचिरोली नामदेव किरसान, भंडारा-गोंदिया प्रशांत पडोले यांना उमेदवारी देण्यात आली होती.
त्यामुळे आता महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात 9 ठिकाणी थेट लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. मात्र महायुतीत आणि महाविकास आघाडीत अजूनही काही जागांवर वाद आहे. कारण भाजपा आणि काँग्रेस व्यतिरिक्त कोणही अद्यापही आपल्या उमेदवारांची यादी घोषित केलेली नाही. | Lok Sabha Election 2024