मुंबई – अभिनेता शाहरुख खानचा जवान चित्रपट सुपरहीट ठरला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने मोठी कमाई केली. चार वर्षांच्या ब्रेकनंतर शाहरूखचा ‘पठाण’ चित्रपट रिलीज झाला होता. त्याचा हा चित्रपट देखील सुपरहिट ठरला. शाहरूख खानच्या पठाण आणि जवान या दोन्हीही चित्रपटांना प्रेक्षकांचे भरभरून प्रतिसाद मिळाला. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर हजार कोटींच्यावर कमाई केली आहे.
हे दोन्ही चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर याच वर्षी शाहरुखचा ‘डंकी’ हा सिनेमा डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. तर जवान या चित्रपटाला एक महिन्यानतंरही मोठा प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटगृहात जवानने मोठी कमाई केल्यानंतर आता तो ओटीटीवर रिलीज होणार आहे. ज lवान हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होण्यासाठी सज्ज असल्याचे बोलले जात आहे. नेटफ्लिक्सने जवान चित्रपटाचे ओटीटी हक्क तब्बल 250 कोटी रुपयांना विकत घेतले असल्याचे बोललं जात आहे.
शाहरुखचा जवान हा सिनेमा ऑक्टोबरच्या अखेरीस 28 किंवा 29 तारखेच्या आसपास नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार अशी चर्चा आहे. तर पिंकव्हिलाच्या वृत्तानुसार, जवान चित्रपट शाहरुखच्या वाढदिवशी म्हणजेच 2 नोव्हेंबर रोजी Netflix वर रिलीज होणार आहे. यावर्षी शाहरुखचा 58 वा वाढदिवस आहे. मात्र याबाबात अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
दरम्यान, जवानाने आतापर्यंत जगभरात 1100 कोटींची कमाई तर भारतात 618 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटात शाहरुखसह विजय सेतुपती, नयनतारा, दीपिका पदुकोण, संजय दत्त, गिरिजा ओक, सान्या मल्होत्रा हे जबरदस्त कलाकार मंडळी आहेत.