Gauri Khan First Restaurant : शाहरुख खानचे अनेक चित्रपट सुपरहिट झाले आहेत. त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. मात्र सध्या किंग खानची पत्नी गौरी खानची चर्चा रंगली आहे. प्रसिद्ध इंटिरियर डिझायनर असलेल्या गौरीने नवीन सुरुवात केली आहे. गौरी खानने तिचे पहिले मुंबईत रेस्टॉरंट खुले केले आहे. याची एक झलकही तिने इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. गौरी खान तिच्या रेस्टॉरंटच्या ओपनिंगमध्ये खूपच स्टायलिश दिसत होती. यावेळी अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
त्यापूर्वी गौरी खानने शेअर केलल्या फोटोत तिने अलिशान रेस्टॉरंटची झलक दाखवली आहे. रेस्टॉरंटचे सुंदर इंटीरियर अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. या फोटोंसोबत गौरीने “माझे पहिले रेस्टॉरंट ‘टोरी’ मुंबईत तुमच्यासाठी उघडले आहे,” असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. गौरी खानच्या रेस्टॉरंटच्या ओपनिंगमध्ये महीप कपूर, सीमा सजदेव, भावना पांडे, करण जोहर आणि नीलम कोठारी यांसारख्या स्टार पत्नींनी हजेरी लावली आहे. यावेळी सर्वजण अतिशय सुंदर दिसत होते. गौरीनेही तिच्या स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधले होते.
View this post on Instagram
इंटिरियर डिझाइनबद्दल बोलायचे झाले तर , गौरी खानने आत्तापर्यंत मुकेश अंबानी, करण जोहर, दीपिका पदुकोण, कार्तिक आर्यन, कतरिना कैफ, जॅकलिन अनन्या पांडे आणि फराह खान यांच्यासह अनेक मोठ्या सेलिब्रिटींचे घर सजवले आहे. इंटेरिअर डिझायनर असण्यासोबतच गौरी खान प्रोड्युसर देखील आहे. अनेक वर्षांपूर्वी तिने पती शाहरुख खानसोबत रेड चिलीज एंटरटेनमेंट नावाचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले होते. तिने अनेक चित्रपटांची निर्मितीही केली आहे. अलीकडेच गौरीने राजकुमार हिरानी यांच्या सहकार्याने शाहरुखचा डंकी हा चित्रपट तयार केला होता.