वाघोली – शेतकऱ्यांच्या हितासाठी संचालक मंडळाने नेहमी सतर्क राहावे असे अनमोल मार्गदर्शन देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या विविध सुविधांबाबत आढावा घेतल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रामकृष्ण सातव पाटील यांनी दिली.
बारामती येथील त्यांच्या निवासस्थानी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रामकृष्ण सातव पाटील यांनी सदिच्छा भेट घेत शरदचंद्रजी पवार यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी पारंपारिक शेती ला आधुनिकीकरणाची जोड देण्याबाबत शरद पवार यांनी मार्गदर्शन केले. कृषी उत्पन्न बाजार समितीने राबवल्या विविध उपक्रमांचा आढावा त्यांनी रामकृष्ण सातव पाटील यांच्याकडून घेतला.
यावेळी शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजार भाव तसेच मालाची साठवणूक क्षमता उत्तम करण्यासाठी कोल्ड स्टोरेज, शेतकऱ्यांना मालाची ने आण करताना अडचणी येऊ नये यासाठी उपबाजारांची निर्मिती व दूरवरून येणाऱ्या शेतकऱ्यांच्या निवासाची सोय करण्याबाबत मार्गदर्शन केले असल्याचे रामकृष्ण सातव पाटील यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या हितासाठी संचालक मंडळाने नेहमी सतर्क राहून कार्य करण्याबाबत शरद पवार यांनी मार्गदर्शन केले.
शेती करणारा शेतकरी व शेती ह्या दोघांसाठी आमुलाग्र बदलांची मांदियाळी निर्माण करणारा ऊर्जास्रोत म्हणून पवार साहेब नेहमीच उत्तम मार्गदर्शकाची भूमिका बजावत आले असून त्यांची भेट ही प्रेरणादायी आहे. – रामकृष्ण सातव पाटील, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे