लेह लडाख येथील हल्ल्यात देऊळगाव राजे येथील जवान शहीद

देऊळगाव राजे- जम्मू-काश्‍मीर येथील लेह-लडाख येथे आज (दि. 21) दुपारी झालेल्या हल्ल्यात देऊळगाव राजे (ता. दौंड) येथील सुभेदार बाळासाहेब प्रल्हाद पळसकर यांना वीरमरण आले आहे. त्यांच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी आणि दोन मुले असा त्यांचा परिवार आहे. त्यांचे आई-वडील गावाकडे, तर पत्नी व मुले पुणे येथे वास्तव्यास आहेत. त्यांचे पार्थिव मंगळवार (दि. 22) देऊळगाव राजे येथे आणण्यात येणार आहे आणि सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, असे त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.