काटेवाडीत पवार कुटुंबीयांचा लोकशाही दिन

भवानीनगर- बारामती विधानसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस पक्षाचे आघाडीचे उमेदवार अजित पवार यांनी आज सकाळी सात वाजता मतदान केले. त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, त्यांचे बंधू श्रीनिवास पवार, शर्मिला पवार, अजित पवार यांची बहीण गीता पाटील आणि पवार यांची आई आशा पवार यांनी मतदानांचा हक्‍क बजावला.

यावेळी पवार म्हणाले की, आजपर्यंतच्या माझ्या 40 वर्षाच्या काळात सलग तीन दिवस मोठा पाऊस कधी पडलेला मी पाहिला नव्हता. त्यामुळे आजही पावसामुळे मतदान घटण्याची शक्‍यता होती. परंतु पाऊस न आल्याने मतदान होण्यास अडचण निर्माण होणार नाही. मतांची टक्‍केवारी वाढावी यासाठी साडेसात ते साडेपाचऐवजी मतदानाची वेळ सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत म्हणजे एक तास वाढविण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.