मुंबई – ‘स्वराज्य’ निर्मितीच्या पवित्र कार्यात अनेक मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. शिवकालीन इतिहासाच्या पानांवर या मावळ्यांचं कर्तृत्त्व सोनेरी अक्षरात कोरलं आहे. या मावळ्यांपैकी एक नाव म्हणजेच तानाजी मालुसरे. तानाजींच्या पराक्रमाची कथा आता चित्रपटाच्या रुपात मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाचा नुकतंच ऑफिशल पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. यामध्ये बॉलिवूड अभिनेता ‘अजय देवगण’ तानाजींची भूमिका साकारत आहे. तर या चित्रपटात सैफ अली खान हा राजपुत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत आहे. दरम्यान, 150 कोटी रुपयांच्या बजेट असलेल्या या चित्रपटात तानाजी मालुसरेंच्या पत्नीची भूमिका काजोल साकारणार असल्याचं म्हटलं जात आहे. हा चित्रपट 10 जानेवारी 2020 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
MIND vs MIGHT. The epic battle begins in 3D on 10th January 2020! #TanhajiTheUnsungWarrior@itsKajolD #SaifAliKhan @omraut @itsBhushanKumar @ADFFilms @TSeries @TanhajiFilm pic.twitter.com/2l1YvR3r7J
— Ajay Devgn (@ajaydevgn) October 21, 2019
MIGHT that cut deeper than a sword… #TanhajiTheUnsungWarrior, in cinemas 10th January 2020.@itsKajolD #SaifAliKhan @omraut @itsBhushanKumar @ADFFilms @TSeries @TanhajiFilm pic.twitter.com/QUKU9ayYQt
— Ajay Devgn (@ajaydevgn) October 21, 2019
MIND that was as sharp as a sword…#TanhajiTheUnsungWarrior, in cinemas 10th January 2020.@itsKajolD #SaifAliKhan @omraut @itsBhushanKumar @ADFFilms @TSeries @TanhajiFilm pic.twitter.com/t23NbaqiYM
— Ajay Devgn (@ajaydevgn) October 21, 2019