मुंबई – अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. बॉलीवूड चित्रपटांना अपयश मिळत असताना शाहरुखच्या ‘पठाण’ ने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. यानंतर आता शाहरुखच्या ‘जवान’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. त्यापूर्वी ‘जवान’ या चित्रपटाचा प्रीव्हू व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. काही वेळात या व्हिडिओ प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
‘जवान’च्या प्रीव्ह्यूमध्ये एकापेक्षा एक दमदार ॲक्शन सीन्स पहायला मिळत आहेत. फक्त शाहरुखच नाही तर नयनतारा आणि दीपिकासुद्धा अॅक्शन सीन्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओतील सीन्सची सिनेमॅटोग्राफी विशेष लक्ष वेधून घेते. त्याचप्रमाणे यामध्ये किंग खानचे चार वेगवेगळे लूक पहायला मिळतात. प्रीव्ह्यूची सुरुवातच शाहरुखच्या आवाजाने होते. दमदार अॅक्शन सीन्ससोबतच ‘बेकरार करके’ हे रेट्रो गाणंसुद्धा ऐकायला मिळते.
‘जवान’ हा चित्रपट 2 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र आता हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुख खानबरोबर दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आणि अभिनेता विजय सेतुपती, अभिनेत्री दीपिका पदुकोण देखील दिसणार आहे. तसेच या चित्रपटात किंग खान सोबत मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. ती यात कोणत्या भूमिकेत दिसणार हे आता समोर आलं आहे.
या चित्रपटात तिची अगदी वेगळी भूमिका आहे. अशा प्रकारची भूमिका गिरीजाने याआधी साकारलेली नाही. या चित्रपटातील शाहरुख खानच्या टीममध्ये आहे. या चित्रपटात ती ॲक्शन करतानाही दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रिव्ह्यू व्हिडीओमध्ये ती बंदूक चालवताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे या चित्रपटात प्रेक्षकांना गिरिजाचा एक अनोखा आणि डॅशिंग अंदाज दिसणार हे नक्की.