टोकियो, (जपान) – जपानची राजधानी टोकियोमधील हानेदा विमानतळावर एका विमानाने धावपट्टीवरच पेट घेतल्याची घटना आज घडली आहे. या विमानातील सर्व ४०० प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले असल्याचे वृत्तवाहिनीच्या वृत्तामध्ये म्हटले आहे.
धावत्या विमानाने पेट घेतल्यानंतर थोड्याच काळात विमानाच्या इंधनाच्या टाकीतून आगीचे लोट उठू लागले आणि धूराचे मोठे लोट आकाशात उठताना दिसले होते. विमानाच्या एका पंखातून आगीच्या ज्वाळा उठताना दिसल्या.
जेएएल ५१६ जातीचे हे विमान जपानमधील शिन चितोत्से येथून हनेदा येथे आले होते. थोट्या वेळाने या विमानाला लागलेली आग विझवताना अग्निशामक दलाचे कर्मचारी दिसत होते. त्यावेळी विमानाच्या पंखाला लागलेली आग संपूर्ण विमानभर पसरल्याचे दिसत होते. हे विमान धावपट्टीजवळ असलेल्या जपानच्या तटरक्षक दलाच्या दुसऱ्या एका विमानाला धडकल्याचे वृत्तवाहिनीने म्हटले आहे.
धडक झाल्याच्या वृत्ताची शहानिशा केली जात असल्याचे जपानच्या तटरक्षक दलाने म्हटले आहे. या अपघाताविषयी अधिक तपशील उपलब्ध करून दिला गेला नाही. हनेदा हा जपानमधील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक विमानतळ आहे.