नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी संध्याकाळी जपानला रवाना झाले. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी ते 23 ते 24 मे दरम्यान टोकियो (जपान)ला भेट देतील. येथे ते क्वाड समिटमध्येही सहभागी होणार आहेत. जपानमधील जवळपास 40 तासांच्या मुक्कामात पंतप्रधान मोदी 23 कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत, ज्यात तीन जागतिक नेत्यांच्या भेटींचा समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि ऑस्ट्रेलिया आणि जपानच्या पंतप्रधानांसह 24 मे रोजी टोकियो येथे होणाऱ्या क्वाड समिटमध्ये सहभागी होणार आहेत. ते 36 हून अधिक जपानी सीईओ आणि शेकडो भारतीय प्रवासी सदस्यांशी संवाद साधतील.
#WATCH दिल्ली: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जापान के प्रधानमंत्री फ़ुमिओ किशिदा के निमंत्रण पर जापान दौरे के लिए रवाना हुए।
PM 23-24 मई तक जापान दौरे पर रहेंगे। वे इंडो-पैसिफिक इकोनॉमिक फ्रेमवर्क इवेंट में भाग लेंगे। वे जापानी कारोबारियों के साथ गोलमेज सम्मेलन में भी भाग लेंगे। pic.twitter.com/r1FSxut4IJ
— ANI_HindiNews (@AHindinews) May 22, 2022
तत्पूर्वी, पंतप्रधान मोदी म्हणाले की, क्वाड शिखर परिषदेमुळे समूहाने घेतलेल्या पुढाकारांच्या प्रगतीचा आढावा घेण्याची संधी मिळेल. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील घडामोडींसोबतच परस्पर हिताच्या जागतिक मुद्द्यांवर विचार मांडण्याची संधीही मिळणार आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाच्या दरम्यान क्वाडची बैठक होणार आहे. 23-24 मे रोजी जपानच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जाण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात पंतप्रधान मोदी म्हणाले की, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या निमंत्रणावरून ते टोकियो, जपानला जात आहेत.