मुंबई – बॉलिवूड अभिनेता जान्हवी कपूर बॉलिवूड इंडस्ट्रीतील हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या कामासोबतच ही अभिनेत्री तिच्या बोल्ड इमेजसाठीही खूप चर्चेत असते. जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या हॉट फोटोंमुळे इंटरनेटवर खळबळ माजवत असते. जान्हवीचे चाहते तिच्या नवीन पोस्ट्सची आतुरतेने वाट पाहत असतात. अश्यातच, अभिनेत्रीने आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली असून, तिच्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधलं आहे. यामध्ये अभिनेत्रीने एक गुड न्युज दिल्याचं दिसत येत आहे.
बॉलीवूडच्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मोठी मुलगी म्हणून जान्हवी सगळ्यांना माहिती आहे. पण गेल्या काही वर्षांपासून जान्हवीनं तिची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावर जान्हवीचा चाहतावर्ग मोठा आहे. जान्हवीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जान्हवीचा एक व्हिडिओ फोटो व्हायरल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून जान्हवीच्या रिलेशनशिपविषयी वेगवेगळ्या चर्चांना देखील उधाण आले होते.
दरम्यान, आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्ट मधून जान्हवीने तिच्या आगामी प्रोजेक्टविषयी माहिती दिली आहे. ती लवकरच एनटीआर सोबत टॉलीवूडमध्ये डेब्यु करणार आहे. तिनं जन्मदिनाच्या दिवशी ही बातमी सांगितली आहे. ही गोड बातमी दिल्यावर चाहत्यांनी तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. सध्या तिची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगल्याची व्हायरल होत असून, अनेकांनी अभिनेत्रीला शुभेच्छा देखील दिल्या आहेत.