श्रीनगर : मध्य काश्मीरमधील श्रीनगर जिल्ह्याच्या एचएमटी परिसरात गुरूवारी दुपारी दहशतवाद्यांनी पुन्हा भ्याड हल्ला केला. या हल्ल्यामध्ये सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाल्याची माहिती मिळाली आहे.
Jammu and Kashmir: Terrorist attack security personnel in HMT area near Srinagar
More details awaited.
— ANI (@ANI) November 26, 2020
पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगरमधील एचएमटी परिसरात सुरक्षा दलाच्या टीमवर दहशतवाद्यांनी गोळीबार करत हल्ला केला आणि त्यानंतर दहशतवादी तेथून फरार झाले. या परिसरास सुरक्षा दलाच्या जवानांनी घेराव घातला आहे. तसेच सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांचे सर्च ऑपरेशन सुरू आहे.
काश्मीरचे महानिरीक्षक (आयजी) दिलेल्या माहितीनुसार, तीन दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. त्यांनी म्हटले आहे की, या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे, हे आम्ही संध्याकाळपर्यंत स्पष्ट करू. हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांमध्ये दोन पाकिस्तानी आणि एक स्थानिकाचा समावेश असल्याची माहिती सध्या आम्हाला मिळाली असून हल्ला केल्यानंतर तिघेही दहशतवादी कारमध्ये बसून फरार झाले आहेत.