श्रीनगर – काश्मीरमधील सोपोर येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मध्यरात्रीपासून चकमक सुरु आहे. या चकमकीत एक जवान गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 22RR, SOG आणि CRPF सुरक्षा दलाने या परिसराला घेरले असून शोधमोहीम हातात घेतली आहे.
Baramulla: Exchange of fire underway between terrorists and security forces in Malmapanpora area of Sopore. More details awaited. #JammuKashmir
— ANI (@ANI) August 3, 2019
दरम्यान, वरिष्ठ पुलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमधील वारपोरा येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे या भागात शोधमोहीम राबवली जात होती. अखेर पहाटे सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना घेरले. यानंतर सुरु झालेल्या चकमकीत एक जवान जखमी झाला आहे.