जामखेडच्या स्टेट बँकेबाहेर सोशल डिस्टन्सिंग फज्जा

जामखेड-जामखेड शहरासह तालुक्यात कोरोनाने हाहाकार माजवला असुन लाॅकडाऊन न करता सर्वानी सोशल डिस्टन्सिंग पालक करण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना होत असताना जामखेड शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया च्या बाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असुन सोशल डिस्टन्सिंग उल्लंघन होत असताना प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. येथिल एस बी आय बँकेत नागरिकांनी पैसे काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. बँके समोर सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी कोणत्याही प्रकारचे सर्कल करण्यात आले नसुन नागरिक सुरक्षित अंतर न पाळता बँकेच्या दारातच एकच गर्दी केली होती.कोणतीही सावधगिरी या लोकांकडून पाळली जात नसल्याने या गर्दीला रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे उभे टाकले आहे.

बॅकेत चार ते पाच ग्राहकांनाच प्रवेश द्यावा तसेच काऊंटरसमोर देखील ठराविक अंतरातच ग्राहक राहतील असे निर्देश आहेत मात्र त्यानंतर देखील अनेक बॅँका आणि एटीएम सेवा देताना काळजी घेत नसल्याचे दिसून आले.बँका आणि एटीएममध्ये देखील सोशल डिस्टन्स ठेवणे सक्तीचे करण्यात आले आहे. प्रत्येक ग्राहक किमान पाच फुटांचे सामायीक अंतर ठेवून बँकमध्ये व एटीएम बाहेर मार्किंग करावे, बँक एटीएमसाठी असलेल्या सुरक्षा कर्मचार्‍यांना हँड ग्लोज वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे.

प्रत्येक बँक आणि एटीएम मध्ये प्रवेश करताना बँकेमार्फत सँनिटायझर उपलब्ध करून द्यावे, रांगेतील प्रत्येक व्यक्तीच्या हातावर सँनिटायझर टाकल्यानंतर त्याने हात स्वच्छ केल्यानंतरच बँकेत अथवा एटीएम येथे प्रवेशास परवानगी द्यावी, ज्या बँक व एटीएममध्ये जास्त गर्दी होते अशा बँकांनी बँकेबाहेर गर्दी नियंत्रणासाठी बँकेच्या व्यवस्थापनाने पुरेसे कर्मचारी नियुक्त करावेत.

तसेच या नियोजनानुसार बँकांनी कामाचे तास व बँक बंद अथवा चालू ठेवण्याची वेळ याबाबत नियोजन करावे तसेच आपत्कालीन परीस्थिती असल्यामुळे उलटपक्षी त्यांनी जास्तीत जास्त वेळ बँक एटीएम उघडे ठेवून नागरीकांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे नियमच आहे पण हे सर्व नियम धाब्यावर बसवून शहरातील बँकांमध्ये व्यवहार सुरू असल्याने प्रशासनाने दखल घेण्याची अपेक्षा आहे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.