जुळ्या मुलींना अलग करण्यात यश

Madhuvan

डॉक्टरांनी केली तब्बल 11 तास शस्त्रक्रिया

वॉशिंगटन : निसर्गाचा चमत्कार नेहमीच आश्चर्यकारक असतो पण काही वेळा आधुनिक विज्ञानही निसर्गावर मात करते. अमेरिकेत नुकतीच अशी घटना घडली. जन्मापासून एकमेकांना चिकटलेल्या २ जुळ्या बहिणींना अलग करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. त्यासाठी डॉक्टरांनी तब्बल ११ तास शस्त्रक्रिया केली.

साराबेट आणि अमेलिया इरविन नावाच्या या बहिणींना जन्मापासून हाथ पाय आणि हृदय वेगवेगळे होते पण त्यांच्या जुळलेल्या शरीरात एकच यकृत होते. या बहिणी एक वर्षाच्या झाल्यानंतर त्यांच्या पालकांनी त्यांना अलग करण्याचा निर्णय घेतला. मिशिगन यूनिवर्सिटीमधील डॉक्टरांनी हे आव्हान स्वीकारले आणि ११ तासांच्या किचकट शस्त्रक्रियेनंतर दोघींची शरीरे अलग करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर या दोन्ही बहिणी आता स्वस्थ आहेत आणि त्यांची प्रकृती सुधारत आहे. 

ही अवघड सर्जरी करणाऱ्या टीमचे प्रमुख डॉक्टर जॉर्ज मिचालिसका यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे ही शस्त्रक्रिया अवघड होतीच पण मनाला भावुक करणारी होती. साराबेट आणि अमेलिया यांची आई एलिसन हिला जास्त आनंद झाला आहे. आता मी माझ्या दोन्ही मुलींना अधिक प्रेम देऊ शकेन असे तिने म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.