राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – हुतात्मा राजगुरू शिक्षण प्रसारक मंडळाचे रत्नाई महाविद्यालयात ग्रीन क्लबच्या वतीने जागतिक जलदिन आयोजन करण्यात आले. ग्रीन क्लब समन्वयक प्रा.उर्मिला गटकळ यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी बनवलेला पोस्टरचे प्रदर्शन भरवण्यात आले. पाणी बचतीचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी शॉर्ट फिल्म दाखविण्यात आल्या.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील पवार, उपप्राचार्य डॉ किशोर भागवत, कनिष्ठ विभागप्रमुख निर्मला आडवळे, सांस्कृतिक विभागाच्या प्रा.हेमा गोगावले सहकारी प्राध्यापक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
पोस्टर प्रदर्शनाच्या माध्यमातून पाण्याचे व पाण्याचे मानवी जीवनातील महत्त्व सांगण्यात आले यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील पवार,उपप्राचार्य डॉ किशोर भागवत यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा .संदेश भोसले यांनी केले तर ओम सुर्वे यांनी आभार मानले