श्रीनगर : पाकिस्तानस्थित जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेच्या एका सदस्याला रविवारी उत्तर काश्मीरमध्ये अटक करण्यात आली.
मोहसीन मंझूर साल्हीया असे सुरक्षा दलांच्या जाळ्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. मागील काही दिवसांपासून सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या विरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्या मोहिमेवेळी बारामुल्लामध्ये दहशतवाद्याचे अस्तित्व असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे जम्मू-काश्मीरचा रहिवासी असणाऱ्या मोहसीनला पकडण्यात आले.
त्याच्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्याचा साठा जप्त करण्यात आला. त्याच्याकडे आक्षेपार्ह स्वरूपाची इतर काही सामग्रीही आढळली. बारामुल्ला परिसरात दहशतवादी हल्ल्यांचा कट रचण्यात आणि तो तडीस नेण्यात मोहसीन सामील असल्याचे प्राथमिक चौकशीतूून निष्पन्न झाले. त्याच्या अटकेमुळे जैशच्या नापाक कारवायांवर आणखी प्रकाश पडण्याची शक्यता आहे.