‘जय जवान, जय किसान’

दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी ही घोषणा दिली. पंडित नेहरूंच्या अकस्मात निधनानंतर शास्त्रींवर पंतप्रधानपदाची जबाबदारी सोपवली गेली. याच काळात पाकिस्तानने भारताची कुरापत काढली. भारताने पाकिस्तानच्या कुरापतीचा यथायोग्य समाचार घेतला आणि पाकिस्तानला युद्धभूमीवर नमवले. त्याकाळात देशात अन्नधान्याची मोठी टंचाई जाणवत होती. वाढत्या लोकसंख्येला देशात उत्पादन केले जाणारे अन्नधान्य पुरेसे ठरत नव्हते. म्हणून 1960 च्या दशकात हरितक्रांतीचा प्रयोग झाला. याची चांगली फळे दिसू लागली होती. त्यामुळे शास्त्रीजींनी “जय जवान, जय किसान’ ही घोषणा दिली.

पाकिस्तानबरोबरचे युद्ध जिंकून दिल्याबद्दल जवानांचा गौरव त्याबरोबरच अन्नधान्याचे उत्पादन वाढविल्याबद्दल शेतकऱ्यांचाही गौरव करणे हा शास्त्रीजींचा या घोषणे मागचा हेतू होता. ही घोषणा देशभर अत्यंत लोकप्रिय ठरली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.