पुणे -पुणे आणि बारामती लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा गुुरुवारी शेवटचा दिवस होता. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज दाखल करणाऱ्यांसाठी गर्दी केली होती. उमेदवार अर्ज भरण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरले जातात. पुणे लोकसभा मतदारसंघातून एका अपक्ष उमेदवाराने चक्क 25 हजारांची चिल्लर भरून निवडणूक अधिकाऱ्यांच्या तोंडाला फेस आणला आहे.
पुणे व बारामती लोकसभा मतदारसंघासाठी अनेक उमेदवारांनी रॅली काढून अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर प्रचारसभाही घेण्यात आल्या आहेत. एका उमेदवारानी आपले वेगळेपण दाखण्यासाठी सोन्याची गोफ गळ्यात घातली होती. मात्र, अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पुणे लोकसभा मतदार संघातून एका अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यासाठी दिली जाणारी अनामत रक्कम ही 10, 5 आणि 2 व 1 रुपयांची नाणी दिली आहेत. 25 हजार रुपयांची चिल्लर तीन बॅग भरून आणली होती. उमेदवार हे अर्ज दाखल करण्यासाठी दुपारी 12 वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात गेले होते. त्यानंतर ते दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास बाहेर आले.