जॅकलिनचा बोल्ड लुक पाहून तुमच्याही हृद्याचे ठोके होतील “वर खाली”

मुंबई – अभिनेत्री ‘जॅकलिन फर्नांडिस’ हिने अतिशय कमी कालावधीतच बॉलिवूडमध्ये आपले चांगलेच प्रस्थ निर्माण केले आहे. ‘चिट्टीयां कल्लाईयां वे…’ या गाण्यामुळे जॅकलिन लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे.

बॉलीवूड अभिनेत्री  जॅकलिन फर्नांडिसने  सोशल आपले वेगळे फॉलोअर्स तयार केले आहेत. ती सोशल मीडियावर खूपच ऍक्‍टिव्ह असते. जॅकलिन  सतत आपले फोटो शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असते.

जॅकलिनने नुकतेच तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत, ज्यात ती  घड्याळी सोबत पोज करतांना दिसत आहे. सध्या या फोटोमुळे सोशलवर चर्चेत आली आहे.  या फोटोतील तिचा अंदाज फॅन्सला अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत आहे.

 

पांढऱ्या  रंगाच्या कपड्यांमध्ये  जॅकलिन  खूपच स्टायलीश आणि तिचा अंदाज एकदम हटके असल्याचा दिसून येत आहे. जॅकलिनचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना चांगलाच आवडत आहे. सध्या तिच्या फोटो शूटमुळे ती सोशलवर प्रचंड गाजली आहेत. वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर जॅकलिन फर्नांडीस आगामी ‘भूत पोलीस’, ‘बच्चन पांडे’ आणि ‘किक २’ सारख्या सिनेमात दिसणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.