मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री ‘जॅकलिन फर्नांडिस’ आणि अभिनेता ‘जॉन अब्राहम’ यांचा बहुचर्चित ‘अटॅक -1’ हा आगामी चित्रपट येत्या 13 ऑगस्ट 2022 रोजी चित्रपटगृहात दस्तक देत आहे. नुकतंच या चित्रपटाचा ऑफिशल ट्रेलर देखील प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘अटॅक -1’ चित्रपटात जॉन अब्राहम आणि जॅकलिनसोबत अभिनेत्री रकुल प्रीत सिंह सुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
जॅकलिन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून, ती नेचमीच आपले वेगवेगळ्या स्टाईल मधील फोटो पोस्ट करते. सध्या तिने असाच एक अतरंगी फोटोशूट केला आहे. फॅन्स देखील तिच्या या अनोख्या लूकवर फिदा झाले असून, लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. दरम्यान, फोटोशूट करताना जॅकलिनने कोट आणि पॅन्ट परिधान करत हटके पोझ दिली आहे.
View this post on Instagram
या फोटोतील खास म्हणजे, जॅकलिन आपल्या दोन्ही पायात वेगवेगळ्या रंगाचे हिल्स परिधान केल्याचे दिसत आहे. तिने एका पायात पांढऱ्या हिल्स तर दुसऱ्या पायात ब्लॅक रंगाचे बूड परिधान केले आहे. हा तिचा हटके आणि अंतरंगी लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर जॅकलिन फर्नांडीस आगामी ‘रामसेतू’, ‘बच्चन पांडे’ आणि ‘किक-2’ अटॅक सारख्या बिग बजेट चित्रपटांमध्ये दिसणार आहे.