पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहर व परिसरातील थंडी कमी झाली असून, पुढील आठवडाभर हवामान कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पश्चिमी चक्रावात उत्तरेत मंदावल्याने हवामानात हा बदल झाला आहे. आणखी आठवडाभर हवामानातील हा बदल राहणार आहे.
उत्तरेतून येणारा चक्रावात मंदावल्याने राज्यातील हवामानात 2 ते 3 अंश सेल्सिअस तापमानाची वाढ झाली आहे. तर उत्तर भारतातील शितलहरी येण्यास आणखी चार ते पाच दिवसांचा कालावधी लागणार आहे. या कालावधीत वातावरण ढगाळ आसून, वाऱ्याचा वेगही कमी आहे. परिणामी हवामान कोरडे राहत आहे.
डिसेंबर अखेर ख्रिसमसच्या दरम्यान शहरात गुलाबी थंडी अनुभवायला मिळत असते. यंदा मात्र हवामानातील बदलामुळे हा शहरात थंडी अनुभवता आली नाही. सकाळी दाट धुके पडत असून, रात्रीनंतर हवामानात गारठा जाणवत आहे.
थंडी कमी होऊन, ढगाळ वातावरण व धुके पडत असल्याने पिकांना मात्र धोका निर्माण झाला आहे. सोमवारी पुण्यात कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस कमाल तापमान तर 13.9 एवढे नोंदविण्यात आले आहे.