मुंबई – मलायका-अरबाज हे कपल कधी काळी बॉलिवूडमधील एक लोकप्रिय कपल म्हणून ओळखलं जायचं. १९९८मध्ये मलायका-अरबाजने लगीनगाठ बांधत सुखी संसाराला सुरुवात केली. मात्र पुढे २०१७मध्ये दोघांनी कायदेशीररीत्या काडीमोड घेतला. दोघेही आपापल्या आयुष्यामध्ये मूव्ह ऑन झाले असून मलायका सध्या अभिनेता अर्जुन कपूरला तर अरबाज जॉर्जिया इन्ड्रीयानीला डेट करतोय.
मलायकासोबत काडीमोड घेतल्यानंतर अरबाज खानने मलायका व अर्जुनच्या नात्यावर जाहीर प्रतिक्रिया दिली नाही. तर 48 वर्षीय मलायकाने अरबाज खानसोबत लहान वयात लग्न ही ‘चूक’ होती का? या प्रश्नावर पहिल्यांदाच यावर मौन सोडले आहे.
मलायकाने प्रथमच याबाबत जाहीर भाष्य केल्याचं पाहायला मिळालं. तिने एका मुलाखतीत सांगितले की,’29 व्या वर्षी आई होणे किंवा वयाच्या 25 व्या वर्षी लग्न करणे ही चूक नव्हती. तसेच यामुळे माझ्या प्रोफेशनल लाईमध्ये कोणतीही अडचण आली नाही. ती पुढे म्हणते, “मला असे वाटते की मी इतर महिलांसाठी एक उदाहरण बनले आहे. मी सर्व काही ग्लॅमरस पद्धतीने केले.” दरम्यान,अर्जुनच्या नात्याबाबत विचारण्यात आले असता तिने यावर शिताफीने उत्तर देत काँट्रीव्हर्सी निर्माण करणं टाळलं.
दरम्यान, मलायका-अर्जुन हे माध्यमांसमोर देखील एकमेकांसोबत मोकळेपणाने वावरताना अनेकदा पाहायला मिळालं आहे. बाॅलीवूड अभिनेत्री ‘मलायका अरोरा’ सोशल मीडियावर सध्या प्रचंड अॅक्टीव असते. त्यावर अनेक फोटो, व्हीडियो शेअर करत असते. अनेक चाहते तिचे हे व्हिडिओ पाहण्यासाठी आतूर असतात. मलायका अशी अभिनेत्री आहे जिने जणू आपल्या वाढत्या वयाला एखाद्या जादूच्या डब्बीत कैद केलंय आणि तारुण्याचं वरदान मिळवलं आहे.