मुंबई – अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अतिशय विचारपूर्वक व बराच अभ्यास करून विधिमंडळात पारीत करण्यात आला. त्यावेळी सगळ्यांचाच विचार करण्यात आला होता. त्यामुळे अंधश्रद्धा कायदा हिंदू विरोधात आहे असे म्हणणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना दिली.
अंधश्रद्धेमुळे काही लोकांची दुकाने बंद होणार असतील, तर मला वाटत नाही की अंधश्रद्धा निर्मूलन कायदा रद्दच करावा, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.
बाळासाहेबांची अन्यायाविरुद्ध लढण्याची शिकवण, विचार, वारसा घेऊन आमची वाटचाल – मुख्यमंत्री शिंदे
अंधश्रद्धा कायदा हिंदूंच्या विरोधात नाही. तो सर्व धर्मात असलेल्या अंधश्रद्धांच्या विरोधात आहे, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.