India vs England 4th Test : मालिकेतील चौथ्या सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाला दुहेरी व मोठा धक्का बसला आहे. केएल राहुल मालिकेतील चौथ्या सामन्यातून बाहेर झाला आहे. तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांतीच्या कारणास्तव मालिकेतील चौथ्या सामन्यासाठी टीम इंडियातून रिलीज ( Jasprit Bumrah released from squad for 4th Test ) करण्यात आले आहे. रांची कसोटीपूर्वी मुकेश कुमारला टीम इंडियात सामील होण्याची संधी मिळाली आहे. यावरून चौथ्या कसोटीत टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये बदल होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने चौथ्या कसोटी सामन्याबाबत एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. बीसीसीआयने सांगितले आहे की, “जसप्रीत बुमराहला मालिकेचा दीर्घ कालावधी लक्षात घेऊन आणि वर्क लोड पाहता विश्रांती देण्यात आली आहे.
जसप्रीत बुमराह संघासह रांचीला गेला नाही. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाजीची धुरा मोहम्मद सिराजच्या खांद्यावर असेल. जसप्रीत बुमराहच्या जागी मुकेश कुमारचा संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र, रांची कसोटीत टीम इंडिया 2 वेगवान गोलंदाजांसह खेळणार की नाही हे स्पष्ट झालेले नाही. स्पिनर्ससाठी उपयुक्त असलेली खेळपट्टी लक्षात घेता टीम इंडिया रांची कसोटीत केवळ एका वेगवान गोलंदाजासह मैदानात उतरू शकते.
🚨 NEWS 🚨
Jasprit Bumrah released from squad for 4th Test.
Details 🔽 #TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank https://t.co/0rjEtHJ3rH pic.twitter.com/C5PcZLHhkY
— BCCI (@BCCI) February 20, 2024
बीसीसीआयने केएल राहुलबद्दल आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, “केएल राहुल चौथ्या कसोटीतून बाहेर पडला आहे. धरमशाला येथे होणाऱ्या अंतिम कसोटी सामन्यात त्याचा सहभाग फिटनेसवर अवलंबून आहे.”
पहिल्या कसोटीनंतर केएल राहुलला दुखापत झाली. दुखापतीमुळे राहुल दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा भाग होऊ शकला नाही. तिसऱ्या कसोटीपूर्वी केएल राहुलच्या जागी देवदत्त पडिक्कलचा संघात समावेश करण्यात आला होता. के. एल. राहुल अजुनही दुखापतीमधून सावरला नसल्याने पडिक्कल संघासोबत कायम असून त्याला चौथ्या कसोटीत पदार्पण करण्याची संधीही मिळू शकते.
रजत पाटीदारला चौथ्या कसोटीच्या प्लेइंग 11 मधून वगळले जाऊ शकते. रजत पाटीदार दोन कसोटीत अपयशी ठरला आहे. त्याला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही आणि चार डावात एकही अर्धशतक झळकावता आले नाही. तर सर्फराज खानने तिसऱ्या कसोटीत शानदार पदार्पण केले. सर्फराजने दोन्ही डावात अर्धशतके झळकावली. सर्फराजला चौथ्या कसोटीत चौथ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळू शकते.
IND vs ENG 3rd Test : व्दिशतकी खेळीसाठी रोहित-जडेजाकडून मिळाली प्रेरणा – यशस्वी जैस्वाल
रांची कसोटीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर , कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.