मोठी कारवाई ! सराफा व्यावसायिकांवर आयकर विभागाचे छापे; 1000 कोटींची मालमत्ता उघड

चेन्नाई – ऐन निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आयकर विभागाने तामिळनाडुच्या प्रख्यात सराफ व्यावसायिकांवर छापे घालून किमान एक हजार रूपयांचे दडवलेले उत्पन्न उघड केले. मात्र ज्या सराफांवर छापे घालण्यात आले आहेत त्यांची नावे मात्र जाहीर करण्यात आलेली नाहीत.

4 मार्च रोजी तामिळनाडुतील या व्यावसायिकांच्या एकूण 27 ठिकाणी छापे मारण्यात आले. त्यात चेन्नाई, मुंबई, मदुराई, तिरूपचिरापल्ली, थ्रिुसुर, जयपूर इत्यादी मालमत्तांचा समावेश आहे.

या छाप्यात 1 कोटी 20 लाखांची रोकडही जप्त करण्यात आली आहे. या सराफांनी खोटी बिले सादर करून बोगस हिशोब दाखवल्याचे अनेक प्रकार उघडकीला आले आहेत. या छाप्यांमध्ये सीबीडीटीचे अधिकारीही सहभागी झाले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.