“इट चॅप्टर 2’ची कोटीच्या कोटी उड्डाणे

बॉलीवुडचे बिग बजेट चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर सपशेल अपयशी होत असताना गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेला अँड्रेस मुश्‍चेट्टी दिग्दर्शित “इट चॅप्टर 2′ हा चित्रपट जगभरातील तिकीटबारीवर धुमाकूळ घालतो आहे. भारतातही या चित्रपटाने आठवड्याभरात 10 कोटींपेक्षा जास्तची कमाई केली आहे.

जगभरातून या चित्रपटाने प्रदर्शित झाल्याच्या पहिल्या आठवड्यात 651 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे लवकरच हा चित्रपट टायटॅनिक आणि अवतार यांसारख्या सर्वाधीक कमाईचे केलेल्या चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवेल असे म्हटले जात आहे. आजवर प्रदर्शित झालेल्या इतर भयपटांपेक्षा वेगळा असलेला “इट चॅप्टर 2′ हा “इट’ चित्रपट मालिकेतील दुसरा चित्रपट आहे.

ही मालिका स्टीफन किंग यांच्या 1986 सालच्या कादंबरीवर आधारीत आहे. ही कादंबरी जगभरात तुफान गाजली होती. आजवर सर्वाधीक वाचल्या गेलेल्या पुस्तकांच्या यादीत ही कांदंबरी तीसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे जगभरातील प्रेक्षक या चित्रपटाच्या दिशेने खेचले गेले जात आहेत. आणि म्हणून पहिल्याच आठवड्यात त्यांना 651 कोटींचा आकडा पार करता आला. भारतातही या चित्रपटाने 10 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×