अँडलेड – आशियाई क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेता विष्णू सरवणन हा सलग दोन ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय नाविक ठरला. तो यापूर्वी टोकियो ऑलिम्पिकमध्येही सहभागी झाला होता. बुधवारी येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या माध्यमातून त्याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवले.
मुंबईस्थित आर्मी सेलिंग नोडमधील सुभेदार असणाऱ्या २४ वर्षीय सरवणनने येथे झालेल्या आयएलसीए सेव्हन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये १५२ स्पर्धकांमध्ये २६ वे स्थान मिळवून पॅरिसचे तिकीट काढले आहे. यावर्षी पॅरिस, फ्रान्समध्ये २६ जुलै ते ११ ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे.
Riding the waves to #Paris2024 ✌️ ⛵
🇮🇳’s Vishnu Saravanan has secured India’s 1⃣st #ParisOlympics quota in Sailing at the ILCA 7 World Championship, held in Adelaide, 🇦🇺
Clinching one of the 7⃣ Olympic quotas available at the event, #TOPScheme Athlete Vishnu outsailed many… pic.twitter.com/v2RAczziZ6
— SAI Media (@Media_SAI) January 31, 2024
आशियाई देशांतील खेळाडूंमध्ये सरवणन अव्वल स्थानावर राहिला. त्याने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या सिंगापूरच्या खेळाडूचा पराभव केला. सरवणनची एकूण धावसंख्या १७४ होती. मानक नियमांनुसार, त्याचा निव्वळ स्कोअर १२५ वर ठेवून त्याचा किमान स्कोअर ४९ काढून टाकण्यात आला. विष्णू २०१९ अंडर-२१ वर्ल्ड चॅम्पियनशिपचा कांस्यपदक विजेता आहे.