नवी दिल्ली – इस्रायल (israel) आणि हमास यांच्यातील युद्धाचा आज चौथा दिवस आहे. भारत आणि अमेरिकेसह अनेक देश इस्रायलच्या पाठीशी उभे आहेत. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवर चर्चा केली. (israel Prime Minister’s call to PM Modi)
पीएम मोदींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. पीएम मोदींनी पोस्टमध्ये म्हंटले, “इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी मला फोन करून तिथल्या परिस्थितीची माहिती दिली, याबाबत मी त्यांचे आभार मानतो. या बिकट परिस्थितीत आम्ही भारतीय लोक इस्रायलच्या बाजूने खंबीरपणे उभे आहोत. भारत अशा दहशतवादी कृत्यांचा तीव्र आणि निःसंदिग्धपणे निषेध करतो.”
I thank Prime Minister @netanyahu for his phone call and providing an update on the ongoing situation. People of India stand firmly with Israel in this difficult hour. India strongly and unequivocally condemns terrorism in all its forms and manifestations.
— Narendra Modi (@narendramodi) October 10, 2023
युद्धात 1500 हून अधिक लोक मरण पावले
हमासच्या दहशतवाद्यांनी शनिवारी पहाटे इस्रायलवर (israel war) अचानक रॉकेट हल्ला केला. या हल्ल्याला इस्रायलनेही चोख प्रत्युत्तर दिले. बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासच्या दहशतवाद्यांविरुद्ध युद्ध सुरू केले आणि गाझामध्ये उपस्थित असलेल्या दहशतवाद्यांवर रॉकेट आणि बॉम्बने हल्ले करण्यास सुरुवात केली.
या युद्धात आतापर्यंत 900 इस्रायली लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी गाझामध्ये 687 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या युद्धात आतापर्यंत एकूण 1500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
पंतप्रधान नेतन्याहू यांनी हमासला इशारा दिला
हमासने इस्रायलला इशारा दिला होता की, जर त्यांनी बॉम्बफेक थांबवली नाही तर ते इस्रायलमधून अपहरण केलेल्या लोकांना मारण्यास सुरुवात करेल. त्याचवेळी बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्धातून माघार घेण्यास नकार दिला आहे. भविष्यात आपण जी पावले उचलणार आहोत त्याचा थेट परिणाम आपल्या भावी पिढ्यांवर होईल, असे नेतन्याहू यांनी एक निवेदन जारी केले.