Vasant More – मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे (Vasant More) सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. मराठी माणसाच्या हक्काचा विषय असो वा एखाद्याला मदत करणं असो मोरे आपली प्रत्येक अपडेट सोशल मीडियावरून देत असतात. सोशल मीडियावर देखील त्यांचा मोठा चाहता वर्ग असून, त्यांची प्रत्येक पोस्ट नेहमीच ते चर्चेत असते.
मात्र, आता पुन्हा एकदा वसंत मोरे हे नाव चर्चेत असल्याचं दिसून येत आहे. आज 10 ऑक्टोंबर रोजी वसंत मोरे यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या जन्मदिनी कार्यकर्त्यांनी मोरे यांचा वाढदिवस साजरा करत त्यांचा लाल दिव्याची ॲम्बेसिडर कार (Ambassador car) भेट म्हणून दिली आहे. अखिल मोरे बाग मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी ही कार भेट दिली आहे.
पुणे शहरातून लोकसभा निवडणूक लढवून खासदार होण्याची इच्छा त्यांनी आधीच व्यक्त केली आहे. आता लाल दिव्याची गाडी भेट दिल्यामुळे खासदारकीसोबत मंत्रीपदाचेही स्वप्न वसंत मोरे यांना पडू लागले आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
वसंत मोरे यांचा वाढदिवस असल्याने संपूर्ण पुणे शहरांमध्ये त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे बॅनर लागलेले आहेत. या बॅनरवर ‘भावी खासदार’ वसंत मोरे असा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच, ‘किंग ऑफ पुणे वसंत मोरे’ म्हटले आहे.