मंचर – गिरवली – भैरवनाथवाडी (ता. आंबेगाव) येथे गोठा बांधण्याच्या कारणावरून एकाला मारहाण तर दोघांना शिवीगाळ केल्याप्रकरणी तिघांच्या विरोधात घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विठ्ठल सिताराम भेके, चंदा विठ्ठल भेके, वैभव विठ्ठल भेके असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर नंदन शांताराम भेके यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जवान एम. एम. झनकर करीत आहे.