कोलकाता : इंडियन सुपर लीगमधील (आयएसएल) मोहन बागान हा क्लब अॅटलेटिको कोलकाता (एटीके) संघामध्ये विलीन होणार आहे. आयएसएल च्या पुढील मोसमापासून हा संघ ‘एटीके-मोहन बागान’ म्हणून ओळखला जाणार आहे.
RP Sanjiv Goenka Group acquires majority stake in @Mohun_Bagan. #ATK #MohunBagan #AamarBukeyATK pic.twitter.com/xmFi1NxNu0
— Mohun Bagan Super Giant (@mohunbagansg) January 16, 2020
एटीकेची मालकी असणा-या आरपी-संजीव गोयंका ग्रुपकडे मोहन बागान क्लबमधील ८० टक्के समभाग असणार आहे.
‘एटीके-मोहन बागान’ हा संघ आयएसएल २०२०-२१ मध्ये एकत्र खेळणार आहेत. सध्याच्या मोसमात हे संघ वेगळे-वेगळे खेळत आहेत.