मेलबर्न : भारताचा टेनिसपटू प्रज्ञेश गुणेश्वरनला आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेतील पुरूष एकेरीच्या मुख्य फेरीत प्रवेश मिळविण्यात अपयश आले आहे. शुक्रवारी झालेल्या पात्रतेच्या अंतिम फेरीत प्रज्ञेशचा लॅटव्हियाच्या एर्नेस्ट्स गुल्बिसने ६-७(२), २-६ असा पराभव केला.
Prajnesh Gunneswaran fails to qualify for main draw of Australian Open; loses to former World no. 10 Ernests Gulbis in 3rd qualifying round.
So there will be No Indian challenge in Singles. #AusOpen pic.twitter.com/pB8juhGDOl— India_AllSports (@India_AllSports) January 17, 2020
दरम्यान, याआधी प्रज्ञेशने पात्रतेच्या दुस-या फेरीत जर्मनीच्या यानिक हँफमनचा १-६, ६-२, ६-१ असा पराभव करत स्पर्धेच्या पात्रतेच्या अखेरच्या फेरीत प्रवेश केला होता.
Prajnesh Gunneswaran is one win away from entering the main draw of the #AusOpen
The highest-ranked Indian in Singles defeated Y. Hanfmann 1-6, 6-2, 6-1 & will face Ernests Gulbis in the final round tomorrow 🇮🇳💪#AO2020 @PrajneshGP pic.twitter.com/kTIhCsFc7m
— Tata Open Maharashtra (@MaharashtraOpen) January 16, 2020
तर याआधी, प्रज्ञेशने सलामीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या हॅरी बाॅर्शिएरचा ६-२, ६-४ असा पराभव करत दुस-या फेरीत प्रवेश केला होता. दुसरीकडे भारताच्या सुमीत नागलला पात्रतेच्या दुस-या फेरीतच पराभव स्विकारावा लागल्यानं स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं होत.त्याचा इजिप्तच्या महंमद सफ्वातने ७-६(२), ६-२ ने पराभव केला होता.