नवी दिल्ली : मुंबई सिटी एफसी संघाने सलग दोन पराभवानंतर पुनरागमन करत इंडियन सुपर लीगमध्ये शुक्रवारी झालेल्या सामन्यात गतविजेत्या ‘बेंगळूरू एफसी’चा २-० ने पराभव करत विजय मिळविला आहे.
The Islanders become the first-ever #HeroISL team to do the league double over @bengalurufc 👍#MCFCBFC #LetsFootball pic.twitter.com/viuTDgbtFl
— Indian Super League (@IndSuperLeague) January 17, 2020
मुंबई सिटी एफसी संघाकडून मोदू सोगूने १३ व्या मिनिटाला गोल करत संघास १-० ने आघाडीवर नेले. त्यानंतर एमीन चेरमीतीने ५५ व्या मिनिटाला गोल करत संघाची आघाडी २-० ने आणखी भक्कम केली. ही आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली आणि मुंबई सिटी एफसीने हा सामना जिंकला.
बेंगळुरू एफसीचा संघ या पराभवानंतरही २२ गुणांसह गुणतालिकेत दुस-या स्थानी कायम आहे तर एफसी गोवा संघ २४ गुणांसह अव्वलस्थानी आहे. मुंबई सिटी एफसीचा संघ विजयानंतरही १९ गुणांसह गुणतालिकेत ५ व्या स्थानी कायम आहे.