नवी दिल्ली : मेसी बाउलीच्या दोन गोलाच्या जोरावर केरळ ब्लास्टर्सने इंडियन सुपर लीगच्या सहाव्या सत्रात शुक्रवारी जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये झालेल्या रोमांचक सामन्यात जमशेदपूर एफसीला २-२ ने बरोबरीत रोखले. मेसीने हे दोन गोल केले त्यावेळी त्याचा संघ ०-२ ने पिछाडीवर होता.
.@KeralaBlasters' dominance finally paid off as 2⃣ late goals helped them salvage a draw in Kochi 👍#KBFCJFC #HeroISL #LetsFootball pic.twitter.com/QYC52z0RCy
— Indian Super League (@IndSuperLeague) December 13, 2019
केरळकडून मेसीने ७५ व्या आणि ८७ व्या मिनिटाला गोल केले. तर, जमशेदपूरकडून पिटीने ३८ व्या मिनिटाला पेनल्टीव्दारे आणि सीके विनीतने ७१ व्या मिनिटाला गोल केला.
जमशेदपूरचा हा आठ सामन्यातील चौथा बरोबरीत (ड्रा) सुटलेला सामना ठरला. जमशेदपूरचे आता १३ गुण झाले असून ते गुणतालिकेत तिस-या स्थानी पोहचले आहे. तर, केरळचा हा आठ सामन्यातील चोथा ड्रा ठरला. केरळचा संघ ७ गुणासह गुणतालिकेत सातव्या स्थानी आहे.