#ISL : मुंबई सिटी एफसी विरूध्द केरला ब्लास्टर्स सामना बरोबरीत

पुणे : इंडियन सुपर लीगमध्ये गुरूवारी मुंबई सिटी एफसी आणि केरला ब्लास्टर्स दरम्यान झालेला सामना १-१ ने बरोबरीत सुटला.

सामन्यात दोन्ही गोल दुस-सा सत्रात दोन मिनिटाच्या अंतरावर झाले. केरल संघाकडून ७५ व्या मिनिटाला राफेल मेसी बाउली याने गोल करत १-० ने आघाडी मिळवून दिली, मात्र ही आघाडी केरला ससंघास फार काळ टिकवता आली नाही. त्यानंतर पुढच्या दोनच मिनिटांनी मुंबईच्या अमीन चेरमितीने गोल करत बरोबरी साधली.

सामना बरोबरीत सुटल्याने मुंबई संघाला गुणतालिकेत एका स्थानचा फायदा झाला. मुंबईचा संघ सातव्या स्थानावरून सहाव्या स्थानी पोहचला. ओडिशा सहाव्या स्थानावरून सातव्या स्थानी पोहचला. ब्लास्टर्स अजूनही आठव्या स्थानी कायम आहे. मुंबईचा सात सामन्यातील हा चौथा तर केरलाचा तीसरा बरोबरीतला सामना आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.