नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज ७१ वा वाढदिवस असून त्यानिमित्त काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल नेटवर्किंगवरही मोदींच्या वाढदिवसाचीच चर्चा असल्याचं चित्र दिसत आहे. भाजपाकडून मोदींनी केलेल्या कामाचा पाढा वाचला जात असून मुख्य विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेसकडून १७ सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा केला जात आहे. असे असतानाच राहुल गांधींच्या ट्विटने अनेकांचे लक्ष्य वेधून घेत असून त्यांच्यावर मोदी समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Happy birthday, Modi ji.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 17, 2021
सोशल नेटवर्किंगवर मोदी समर्थक विरुद्ध विरोधक असा सामना रंगल्याचे चित्र दिसत आहे. अशातच राहुल गांधींनी अगदी मोजक्या शब्दात मोदींना शुभेच्छा दिल्यात. वाढदिवसाच्या शुभेच्छा मोदी जी, असे चार शब्दांचे ट्विट राहुल यांनी इंग्रजीमधून केले आहे.
1. How Modi ji wishes to RG
2. How RG wishes to Modi ji.
Looks like INC is facing famine of words. pic.twitter.com/yLv08xEdMt
— The Liebrand™🇮🇳 (@Thelullz) September 17, 2021
राहुल गांधीच्या या ट्विटवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या असून काहींनी शब्दांचा दुष्काळ पडलाय का ? असा खोचक सवाल विचारला तर काहींनी राहुल यांनी संसदेत मोदींना मारलेल्या मिठीचा फोटो पोस्ट केला आहे.
Friendship goals 🤪 https://t.co/QUPrCeSxtz pic.twitter.com/sM1kpNxEnm
— CA Shivam Kansal (@shivamkansalca) September 17, 2021
एकीकडे राहुल यांचे ट्विट चर्चेत असतानाच दुसरीकडे युथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही. यांनी ट्विटरवरुन आजचा दिवस हा राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा करण्याचे आवाहन करताना, “१७ सप्टेंबर राष्ट्रीय बेरोजगार दिवस, निमित्त आहे कोट्यावधी तरुणांना बेरोजगार बनवणाऱ्या भारताच्या युवाविरोधी पंतप्रधान मोदींचा वाढदिवस,” असे ट्विट केले आहे.
Don’t know why but ye twitt dekhkar hasi aa rahi hai ☺️
Any way happy birthday modi ji https://t.co/zQYwZEuEEC— vikesh Kumar patel (@kumarvikesh92) September 17, 2021
युथ काँग्रेस जारी केलेल्या पत्रकामध्ये बेरोजगारीचा दर हा २.४ वरुन १०.३ पर्यंत वाढल्याचा दावा केलाय. जुमला दिवस हा हॅशटॅगही आज चर्चेत असल्याचे ट्विटरवर दिसून येत आहे.