मुंबई – मिस्टर इंडिया विजेता बॉडी बिल़्डर “मनोज पाटील’ने मुंबईमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्याने लिहिलेल्या चिठ्ठीत अभिनेता साहिल खानवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. साहिल खानवर सायबर बुलिंग आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. सध्या या घटने मुळे एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, आता मनोज पाटील आणि साहिल खान प्रकरणात मनसेने उडी घेतली असून, अभिनेता साहिल खानला इशारा सुद्धा देण्यात आला आहे. “20 सप्टेंबरला साहिल खान मनसेच्या कार्यालयात आला नाही, तर साहिल खानवर मनसे स्टाईलने कारवाई करू” असं म्हंटलं आहे.
तसेच, “बॉडी बिल्डर मनोज पाटील याला न्याय नक्की मिळेल, असा विश्वास मनोज पाटील याच्या मित्रांना मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे सरचिटणीस अमेय खोपकर यांनी दिला आहे.
मनोज पाटीलने चिठ्ठीत काय लिहीले…