पारगाव – पारगाव येथे भीमानदी पात्रात गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा पाण्यात दम लागल्याने बुडून मृत्यू झाला. दापोडी येथील महिला मुलांसोबत 10 ते 15जण सायंकाळी 7 वाजता आले होते.
त्यावेळी सुरेश मात्रोबा पवार (वय 52) हे पोहण्यासाठी नदी पात्रात उतरले होते; परंतु त्यांना दम लागल्याने ते बुडू लागले. नदीकाठावरील दोन जणांनी पाण्यात उडी मारुन त्यांना तीरावर आणण्याचा प्रयत्न केला;
परंतु त्यांनाही दम लागल्याने त्यांनीही धीर सोडला. सुरेश यांना अगदी 15 फुटांवर नदीकाठावर आणत असताना त्यांचा बुडून मृत्यू झाला.