मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्यावर पॉर्नोग्राफी चित्रपट बनविल्याचा ठपका ठेवत मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. राज कुंद्राची न्यायालयाने २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी वाढवली आहे. त्यास काल दिनांक २३ जुलै २०२१ ला न्यायालयात हजर करण्यात आले होते.
दरम्यान, या प्रकरणात शिल्पा शेट्टीच्या घरात क्राईम ब्रांचने छापेमारी केली. या वेळी आणि शिल्पा यांना समोरासमोर बसवून त्यांची कसून चौकशी करण्यात आली. शिल्पाची सहा तास चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शिल्पा शेट्टीचाही porn flims प्रकरणात सहभाग आहे का? शिल्पाला यातून आर्थिक लाभ झाला का? या अनुषंगाने पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. या प्रकरणात आता अभिनेत्री शिल्पा शेट्टीही पोलिसांच्या रडारवर आली आहे.
दरम्यान, राज कुंद्रा चालवत असलेली ॲडल्ट वेबसाईट ‘हॉटशॉट’च्या कंटेंट साठी रोज नवा व्हॉट्सॲप ग्रुप बनवला जायचा असाही खळबळजनक खुलासा या प्रकरणात समोर आला आहे. त्यामुळे सायबर क्राईम ब्रांच कडून वाचण्यासाठी सगळी तयारी करण्यात येत होती हे ही आता समोर येत आहे. हे प्रकरण सर्वात पहिलेफेब्रुवारी महिन्यात समोर आलं होतं. तेव्हा गहना वशिष्ठ समवेत काहींना अटक करण्यात आली होती.