‘या’ राज्यातील तब्बल २५० पेक्षा जास्त चाट, पानविक्रेते निघाले करोडपती

कानपूर : रस्त्याच्या कडेला खाद्य पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यवसायिकांकडे सहसा गरीब किंवा त्यांच्याकडे मुबलक पैसे नसल्याने ते असे काम करत असल्याचा बहुतांशी लोकांचा समज असतो. मात्र जर तुम्हाला हेच पाणीपुरी विक्रेते, भेळ आणि पान विक्रेते लाखो करोडोची कमाई करतात असे सांगितले तर विश्वास बसणार नाही. मात्र हे खरं आहे. ही माहिती प्राप्तीकर आणि जीएसटी खात्यांनी केलेल्या तपासणीतून उघड झाली आहे.

रस्त्यावर पदार्थांची विक्री करतात म्हणून तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू नका. हे विक्रेते लाखाे आणि काेट्यवधी रुपयांची कमाई करत आहेत. त्यांच्याकडे माेठ्या मालमत्ता आहे. मात्र एवढी  कमाई करताना ते एक रुपयाचाही कर भरत नाही.  याविषयीची धक्कादायक माहिती प्राप्तीकर विभागाने दिली आहे.

कानपूर शहरात असे २५० हून अधिक किरकाेळ विक्रेते काेट्यधीश असल्याचे आढळले आहे. याविषयीची एक यादीच प्राप्तिकर विभागाने जारी केली आहे. या यादीत लहान किराणा दुकानदार, औषधविक्रेते, भंगार विक्रेते, पान टपरीवाले किंवा चाट आणि पाणीपुरीचा ठेला लावून व्यवसाय करणारे काेट्यधीश असल्याचे उघड झाले आहे. हे किरकाेळ विक्रेते ना प्राप्तीकर भरतात किंवा त्यांचा जीएसटीशी काही संबंध असताे. मात्र, अशा काेट्यधीशांवर प्राप्तीकर खात्याची नजर हाेती. त्यानुसार तपासणी केल्यानंतर अधिकारी चक्रावून गेले.

प्राप्तीकर विभागाने तंत्रज्ञानाचा वापर करुन या छुप्या कराेडपतींना शोधून काढले. अत्यंत साधे राहणीमान असल्यामुळे हे लाेक कराेडपती असल्याचे लक्षात येत नाही. मात्र, मालमत्तांसाेबत ‘पॅन’ आणि आधार क्रमांक जाेडल्यामुळे त्यांचा पर्दाफाश झाला.  या विक्रेत्यांनी एक रुपयाचाही प्राप्तीकर किंवा जीएसटी भरलेला नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.