Hero ने लाँच केली मोस्ट अफोर्डेबल HF 100; जाणून घ्या फीचर्स…

हीरो मोटोकॉर्पने एंट्री लेव्हल 100 सीसी प्रवासी बाइक सेगमेंटमध्ये आपली सर्वात स्वस्त बाईक ‘एचएफ 100’ बाजारात आणली असून त्याची एक्स शोरूम किंमत 49,400 रुपये आहे. या बाईकमध्ये कंपनीने सेल्फ-स्टार्ट सुविधा प्रदान केलेली नाही. म्हणजे केवळ ब्लॅक पेंट योजनेत या गाडीचे किक स्टार्ट व्हेरिएंट उपलब्ध असतील. हेच कारण आहे की त्याची किंमत सामान्य हीरो एचएफ डिलक्सच्या तुलनेत 1,300 रुपये कमी ठेवली गेली आहे. चला तर, जाणून घेऊया या सर्वांच्या खिशाला परवडणाऱ्या बाईकचे फीचर्स !

मिश्र धातुच्या चाकांसह ट्यूबलेस टायर्स
हीरोची सर्वात स्वस्त बाइक असूनही त्यात ट्यूबलेस टायर्स देण्यात आल्या आहेत. बाकी हिरो एचएफ 100 ची रचना पूर्णपणे एचएफ डिलक्स प्रमाणेच आहे. तथापि, कंपनीने एचएफ 100 मधील काही भाग बदलले आहेत. कंपनीने या बाईकच्या मागील सस्पेंशनमध्ये बदल केले आहेत. एचएफ 100 मध्ये 2-स्टेप्स ऍडजेस्टेबल स्प्रिंग सस्पेन्शन दिले आहे आणि आता त्यांनी सिल्वर ग्रॅब रेलची जागा साधारण ट्यूब ग्रॅब रेलने बदलली आहे. नव्याने लॉन्च झालेल्या हिरो एचएफ 100 मध्ये 9.1 लिटर इंधन टाकी आहे, ज्याची क्षमता सामान्य एचएफ डिलक्सपेक्षा 0.5 लीटरने कमी आहे.

इंजिन
हीरो एचएफ 100 मध्ये ९७. २ सीसीचे एअर कूल्ड, सिंगल सिलिंडर, बीएस ६ इंजिन आहे, जे ८००० आरपीएमवर८. ३६ बीएचपी पॉवर आणि ८. ०५ न्यूटन मीटरची टॉर्क प्रदान करते. हे इंजिन 4 स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. भारतीय बाजारात हिरो एचएफ 100 बजाज सीटी बरोबर जोरदार स्पर्धा देईल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.