इरफान खानच्या मुलाचे बॉलीवूडमध्ये पदार्पण

बॉलीवूडमधील दिवंगत अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबिल खानने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मा निर्मित “काला’ चित्रपटाच्या माध्यमातून तो चित्रपटसृष्टीत पाउल ठेवत आहे. या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Babil (@babil.i.k)


हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. यात बाबिल सोबत अभिनेत्री तृप्ती डमरी देखिल दिसणार आहे. बर्फाच्छादित प्रदेशात चित्रपटाचे शूटिंग झाल्याचे टिझर वरून लक्षात येत आहे.
या टिझरमध्ये अभिनेता बाबिल सोबत तृप्ती ही काहीतरी शोधताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Babil (@babil.i.k)

अशा आशयाच हे टिजर आहे. अद्याप चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली नाही. पण अनेक दिग्गजांनी बाबिलला शुभेच्छा दिल्या आहेत. बाबिल हा अभिनेता इरफान खानचा मुलगा आहे. मागील वर्षी एप्रिल महिन्यातच इरफान ने जगाचा निरोप घेतला होता. आता त्याचा मुलगा सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. तेव्हा इरफान सारखीच अभिनयाची जादू बाबिल देखील दाखवणार का, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.